देवरी येथे 19 ला तालुका आरोग्य शिबीर मेळावा

देवरी 16: (प्रा. डॉ. सुजित टेटे ) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने दि.१९/०४/२०२२ रोज मंगळवारला सकाळी ९ ते दुपारी १.०० वाजे पर्यत ग्रामिण रुग्णालय देवरी जि.गोंदिया येथे तालुका आरोग्य मेळावा शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असुन सदर शिबीरात १) आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यासाठी नोंदणी २) आयुष्मान भारत डिजीटल अभियान अंतर्गत हेल्थ आयडी नोंदणी ३) प्रधानमंत्री जनआयोग्य योजना बाबत नोंदणी. ४) महात्मा फुले जन आरोग्य योजना बाबत नोंदणी. ५) कुपोषित बालक व दुर्धर बालके, अतिजोखमी च्या माता व गंभीर रोगाने ग्रस्त सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येईल. https://prahartimes.com

सदर मेळाव्याची वैशिष्टे: माता बालक सेवा, नवजात अर्भक सेवा, किशोरयीन आरोग्य सेवा वयोवृंद उपचार, कुटूंब नियोजन संसर्गजन्य आजार सेवा नेत्र रोग, मोतीया बिंदू नाक, कान, घसा उपचार कर्करोग, मधुमेह उपचार क्षयरोग, सिकलसेल सेवा इत्यादी.

सर्व जनतेनी या सुवर्णसंधीचा फायदा ध्यावा असे पत्रक ग्रामीण रुग्णालय देवरीच्या वतीने काढण्यात आलेले आहे. सदर आरोग्य शिबीर ग्रामिण रुग्णालय, देवरी जि. गोंदिया वेळ :- सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यत असून शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी प्रशासन व आयोग्य विभाग प्रशासन गोंदिया जिल्हा यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमात प्रामुख्याने खा. अशोकजी नेते गडचिरोली चिमूर, लोकसभा मतदारसंघआ. सहसरामजी कोरोटे आमदार, आमगांव-देवरी विधासभाक्षेत्र श्रीमती नयना गुडे जिल्हाधिकारी, गोंदिया आ. परिणयजी फुके विधानपरिषद सदस्य भंडारा-गोंदिया अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गोंदिया डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया, डॉ. आनंद गजभिये वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, देवरी , डॉ. नितीन वानखेडे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, गोंदिया ,डॉ. ललित कुकडे तालुका आरोग्य अधिकारी देवरी यांची उपस्थिती राहणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share