पोलीस स्टेशन सालेकसा हद्दीत लैंगीक अत्याचार करणाऱ्या अज्ञात आरोपीचा १२ तासाचे आत शोध घेवुन अटक

सालेकसा 16 : दिनांक १४/०४/२०२२ रोजी पिडीत महिला फिर्यादीने पोलीस स्टेशन सालेकसा येथे येवून तक्रार दिली की, दिनांक १२/०४/२०२२ चे सकाळी ०८.०० ते दुपारी १४.३० वा. दरम्यान अनोळखी इसमाने “तुझे हरविलेले साहित्य परतमिळवून देईन, तु माझ्या सोबत चल”, असे सांगुन चांदसुरज जंगलात घेवून जावुन अनोळखी आरोपी याने फिर्यादी सोबत तिचे इच्छेविरुध्द बळजबरीने शारीरीक संबंध केल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरुन अनोळखी आरोपी विरुध्द पो.स्टे. सालेकसा येथे अप क्रं. ११० / २०२२ कलम ३७६ भादवि चा गुन्हा नोंद आहे. मा. पोलीस अधीक्षक सोो. गोंदिया यांनी सदर गुन्हयांचा गांभीर्य लक्षात घेवुन प्रभारी अधिकारी स्थागुशा, पोनि महेश बनसोडे यांना सदर गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध कामी स्थागुशा येथील पोलीस पथक तयार करुन अनोळखी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. प्रभारी अधिकारी स्थागुशा, पोनि महेश बनसोडे यांनी स्थागुशा येथील पथक तयार करुन सदर पथकास अनोळखी आरोपीचा शोध कामी पो.स्टे. सालेकसा हददीत पाठविले. दिनांक १४/०४/२०२२ रोजी स्थागुशा येथील पोलीस पथक हे तात्काळ पो.स्टे. सालेकसा येथे जावुन सदर गुन्हयातील महिला पिडीतास विचारपुस केली असता, तीने आरोपी हा डोंगरगड जि. राजनांदगाव (छ.ग.) येथे भेटला असल्याचे सांगितले व तिला आरोपीचे निश्चीत नाव व पत्ता माहित नसल्याचे सांगितले. तीने फक्त आरोपीचे वर्णन सांगितले. तसेच आरोपीने पो.स्टे. सालेकसा हददीतील मौजा चांदसुरज जंगल परिसरात आणुन सदरचा गुन्हा केला असल्याचे तीने सांगितले. पिडीत महिलेने आरोपीचे सांगितलेले वर्णन, गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेली माहिती व तांत्रिकदृष्ट्या केलेला तपास यावरुन सुनिल शोभेलाल माहुले वय ४० वर्षे रा. मु. जमाकुडो पो. दर्रेकसा ता. सालेकसा जि. गोंदिया याने सदरचा गुन्हा केल्याचा संशय आला. त्यानुसार स्थागुशा येथील पोलीस पथक हे मौजा जमाकुडो पो. दरेकसा ता. सालेकसा येथे जावुन सदर इसमाचा कसोशीने शोध घेवून त्याचा पाठलाग करुन त्यास मोजा जमाकुडो पो. दरेकसा येथे पकडले. त्यास विश्वासात घेवुन सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. स्थागुशा येथील पोलीस पथकाने आरोपी यास ताब्यात घेवून त्यास पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन सालेकसा यांचे ताब्यात दिले. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.स्टे. सालेकसा हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. महेश बनसोडे, पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचे नियंत्रणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक मनोज उघडे, सफौ गोपाल कापगते ब. क्रं. ३९, पो. हवा तुलसीदास लुटे / १२३१, पो. ना. चेतन पटले/१४९९, पो.कॉ. हंसराज भांडारकर ब. क्रं. २०७०, चालक पो.कॉ. विनोद गौतम ब. क्रं. १९८२, चालक पो.कॉ. मुरलीधर पांडे ब.क्रं. १८७६ व पो.ना. दिक्षीतकुमार दमाहे / १०४, सायबर सेल गोंदिया यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.

Share