आमगाव-देवरी मतदार संघातील वीज लोडशेडिंग रद्द करा

■ आमदार कोरोटे यांची ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी/ देवरी १४: गोंदिया जिल्ह्यातील आमगांव-देवरी विधानसभा मतदार संघातील देवरी, आमगाव व सालेकसा हा तालुका आदिवासी, अतिदुर्गम, संवेदनशील, नक्षलग्रस्त व डोंगराळ भागात आहेत. येथे सुरू असलेली रात्रीची वीज लोडशेडिंग रद्द करा अशी मागणी आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली आणि या तिन्ही तालुक्याची वीज लोडशेडिंग रद्द करून वीज अखंडित सुरू करण्या संदर्भात बुधवारी (ता.१३ एप्रिल) रोजी निवेदन सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे की, माझ्या आमगांव-देवरी विधानसभा मतदार संघातील देवरी, आमगाव व सालेकसा हा तालुका आदिवासी, अतिदुर्गम, अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त व डोंगराळ भागात वसलेला आहे। परंतु वीज वितरण कंपनी द्वारे सध्या या भागात रात्रीचे वीज लोडशेडिंग सुरू आहे. या लोडशेडिंग मुळे रात्रीला घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन वर्षांपासूब बंद असलेली वीज लोडशेडिंग पुन्हा सुरू झाल्याने या भागातील जनतेला भर उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. असा उल्लेख आहे.
तरी माझ्या मतदार संघात रात्रीची सुरू असलेली वीज लोडशेडिंग रद्द करा अशी मागणी आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली आणि तिन्ही तालुक्यातील रात्रीची वीज लोडशेडिंग रद्द करून वीज अखंडित सुरु ठेवण्या संदर्भात निवेदन दिले आहे.#

Share