देवरी नगरपंचायतला शहराच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून द्या

■ देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके यांची आदिवासी विकास मंत्र्यांकडे निवेदनातून मागणी

देवरी १४: देवरी शहराची एक मोठी संख्या ही आदिवासी समाजातील लोकांची आहे. आदिवासी तालुका म्हणून देवरी व शहराची शासन दरबारी ओळख आहे. परंतु मागील ६-७ वर्षांपासून देवरी शहराच्या विकास झालेला नाही. तसेच येथील आदिवासी नागरिकांना शबरी घरकुल योजनेचा थेट लाभ मिळत नाही. तरी देवरी शहराच्या प्रभागनिहाय विकासाकरिता आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी उपाययोजनेतून ५ कोटी रुपयांची निधी व शबरी आदिवासी घरकुल योजनेतून येथील आदिवासी नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा या करिता निधी उपलब्ध करून द्यावी अशा आशयाचे निवेदन देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.डी.पाडवी यांना देवरी चे आदिवासी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्फत बुधवारी(ता.१३ एप्रिल) रोजी पाठविण्यात आले. पाठविलेल्या निवेदनात गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगरपंचायत ही विशेष नक्षलग्रस्त क्षेत्रात येते.
या शहरात ५००० हजार च्या जवळपास लोकसंख्या आदिवासी समाजातील नागरिकांची आहे. या शहराचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा आणि प्रत्येक प्रभागातील लोकांना चांगल्या नागरी सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता निधीची आवश्यकता आहे.
तरी आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी उपाययोजनेतून देवरी नगरपंचायतला ५ कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून द्यावी. तसेच शहरातील आदिवासी समाजातील लोकांसाठी शबरी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून देवरी शहरातील जास्तीत जास्त आदिवासी लोकांना या घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता आदिवासी उपायोणजेतून निधी उपलब्ध करून द्यावी अशी उल्लेख आहे.
अशा आशयाचे निवेदन देवरीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्फत राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.डी.पाडवी यांना सादर केले.
या शिष्टमंडळात देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल येरणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, न.पं.चे सभापती तनुजा भेलावे, संजय दरवडे, रितेश अग्रवाल, दिनेश भेलावे आदींचा यात समावेश आहे.

Share