‘जय महावीर’च्या जयघोषाने दुमदुमली देवरी नगरी ; जयंती उत्साहात

देवरी 14 :(डॉ. सुजित टेटे)

कोरानाच्या संकटानंतर दोन वर्षानंतर महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देवरी येथील जैन समाजातर्फे शहरात महावीर जयंती निमित्त भव्य शोभा यात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

सकाळी राष्ट्रीय महामार्ग देवरी येथील जैन मंदिरापासून भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक सजावट असलेल्या सुशोभित रथाची मिरवणूक काढण्यात आली. अहिंसा परमोधर्म की जय, वंदे विरम भगवान महावीर स्वामी की जय’, अशा आवेशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला. जैन बांधव, आबालवृध्दांसह महिला या शोभायात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. महावीर जयंतीनिमित्त जैन समाजातर्फे जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृध्द करणारे भगवान महावीर स्वामी यांची जयंती देवरी शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

http://www .prahartimes.com जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृध्द करणारे भगवान महावीर स्वामी यांची जयंती देवरी शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी महेशकुमार जैन , नरेश जैन , शांतीलाल जैन ,अनिल जैन , योगेश पाटणी , सुशील जैन यांच्या सह सर्व जैन समाज उपस्थित होते.

Share