निराधार अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

गोंदिया: निराधारांना आधार देण्याचे काम मासिक अनुदान देऊन शासन करीत असते. यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. विविध योजनेतील लाभार्थ्यांची निवड करण्याची जबाबदारी ही संजय गांधी निराधार योजना समितीकडे असते. ही समिती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी निुयक्त करतात. परंतु गोंदिया जिल्ह्यात अद्याप ही समिती नियुक्त करण्यात आली नसल्याने शेकडो पात्र लाभार्थी अर्ज करुनही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.

समाजातील अनेक नागरिक वृद्ध, दिव्यांग, विधवा आहेत. परित्यक्त्या, दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. अशा सर्व निराधारांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समितीचा श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगता पेंशन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत पात्र असलेल्या पात्र असलेल्या नागरिकांचे अर्ज मंजूर करण्यासाइी शासनाच्या वतीने संयज गांधी निराधार योजना समिती नियुक्त करण्यात येते.

पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी समितीची नियुक्ती करतात. परंतु गोंदिया जिल्ह्यात अद्याप या समितीची नियुक्ती करण्यात आली नसल्याने शेकडो निराधारांना अद्यापही शासनाचा आधार मिळू शकलेला नाही. या समितीचा अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असतो. तर तहसीलदार हे सचिव असतात. या समितीला मोठे अधिकार आहेत व निराधारांना आधार देण्यासाठी ही समिती महत्वाची आहे. असे असतनाही जिल्ह्यात या समितीची नियुक्ती झाली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share