देवरी शहरातील विद्युत समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांचे महावितरणला निवेदन
◾️देवरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांनी घेतली प्रहार टाईम्सच्या बातमीची दखल , समस्या सोडविण्यासाठी महावितरणला निवेदन
डॉ. सुजित टेटे@प्रहार टाईम्स
देवरी 08: देवरी शहरामध्ये विजेच्या दाबाची मोठी समस्या निर्माण झाली असून इलेक्ट्रिक उपकाराचे मोठे नुकसान होत असल्याने नागरिक संतापल्याचे वृत्त प्रहार टाईम्स नी 5 एप्रिल ला प्रकाशित केले होते. या समस्यांची दखल घेत देवरी नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या उपविभागीय अभियंता यांची भेट घेऊन देवरी शहरातील अनियंत्रित विज दाबाची समस्या तातडीने सोडविण्याचे निवेदन दिले आहे.
यावेळी देवरी नगरपंचायतीचे नवनियुक्य नगराध्यक्ष संजू उईके यांच्या सह नगरसेवक महेश जैन , प्रज्ञा संगीडवार , संजय दरवडे , रितेश अग्रवाल, प्रवीण दहीकर , प्रमोद संगीडवार , छेडीलाल शाहू , धनराज बावनथडे , विनोद भेंडारकर आदी उपस्थित होते.
देवरी शहराची लोकसंख्य बघता विद्युत पुरवठा कमी होत आहे त्यामुले इलेक्ट्रिक उपकरणाचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून पॉवर हाऊस ची क्षमता वाढवून सदर समस्यांचा निराकरण करण्यात यावा असे निवेदनातून मागणी केलेली आहे.
विजेच्या कमी दाबाची समस्या तात्काळ सोडवावी आणि उन्हाच्या तडाख्यात कूलर पंख्यांना गती देऊन लोकांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना निवेदनातून देण्यात आल्या आहेत.