राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत 80 लाभार्थ्यांना 20 हजार रुपयाचे धनादेशाचे वाटप

देवरी 07: देवरी तालुक्यात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत 80 लाभार्थ्यांना 20 हजार रुपयाच्या धनादेशाचे तहसील कार्यालय देवरी येथे वाटप करण्यात आले. या योजनेत दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या 18 ते 59 वयोगटातील व्यक्तीचा मृत्यू झाला आणि कुटुंब निराधार झाला असेल तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (national family benefit scheme maharashtra)या कुटुंबाला शासनाकडून 20,000 हजार रुपये अर्थसहाय्य निधी मिळतो.एखाद्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आणि कुटुंब निराधार झाले असेल, तर ‘राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने’द्वारे या कुटुंबांना सरकारकडून निधी मिळतो.

देवरी तहसिल कार्यालय येथे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत 80 लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी वीस हजार रुपयाचे चेक व शेतकरी आत्महत्या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्याला 1 लाख रुपयाची चेक
आमदार सहसराम भाऊ कोरोटे आमगाव विधान सभा क्षेत्र, यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी राधेश्यामजी बगडिया माजी सभापती देवरी, सरबजीतसिंग भाटिया नगरसेवक देवरी, देवरी तहसीलचे तहसीलदार ए. आर. पवार उपस्थित होते.

सदर योजनेचा लाभ :

❗ एखाद्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आणि कुटुंब निराधार झाले असेल, तर ‘राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने’द्वारे या कुटुंबांना सरकारकडून निधी मिळतो.

❗ या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प (21000किंवा त्यापेक्षा कमी) असेल तरच या योजनेचा लाभ घेता येईल.

❗ या योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयातसुद्धा अर्ज करता येतो.

❗ अर्जासोबत कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, मृत्यु दाखला, आधार कार्ड,  जोडणे आवश्यक आहे.

❗ कुटुंबप्रमुखाचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती झाला असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, व तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला आवश्यक आहे.

❗ मृत व्यक्ती कुटुंबप्रमुख होती, त्या संदर्भातील तलाठय़ांकडून मिळणारा दाखलाही जोडणे आवश्यक आहे.

❗ त्याशिवाय रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र, वारसा प्रमाणपत्र, कुटुंब दारिद्रय़रेषेखालील असल्यास त्याचा दाखला आदी जोडणे खूप आवश्यक आहे.

❗या कागदपत्रांची छाननी झाल्यावर संबंधित कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतील.

Print Friendly, PDF & Email
Share