पाण्याचा काटकसरीने वापर करावामहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन
गोंदिया,दि.7 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, गोंदिया द्वारे गोंदिया शहराला नळाद्वारे दररोज दोन वेळा (सकाळी व सायंकाळी) शहरातील 5 उंच टाक्यामधून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतू गेल्या काही दिवसांपासून वैनगंगा नदी मधील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे नळ योजनेच्या विहिरीमध्ये पाण्याची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे दोन्ही वेळेस पाण्याच्या सर्व टाक्या भरण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व टाक्या एका वेळेस भरुन सकाळच्या वेळेला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्याप टाळावा, जेणेकरुन भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाद्वारे करण्यात येत आहे.
00000