देवरी: नवरात्र उत्सवानिमित्त ठसक्यात पार पडला रास गरबा महोत्सव

डॉ.सुजित टेटे @प्रहार टाईम्स
देवरी 07:
कोरोना काळात सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंधामुळे गरबा प्रेमी आणि नृत्यप्रेमींचा उत्साहावर विरजण आले होते. कोरोनाचा प्रभाव कमी होताच शासनाने संपूर्ण निर्बंध हटविले आणि सर्व आस्थापने संपूर्ण क्षमतेने सुरु झाली. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाची देखील जिकडे तिकडे महोत्सव साजरे झाले. याच पार्शवभूमीवर देवरी येथील माता धुकेश्वरी मंदिर परिसरात रास गरबा महोत्सव ठसक्यात पार पडले असून हजारो नागरिकांनी यावेळी गरबा उत्सवाचा आस्वाद घेतला.

चैत्र नवरात्राच्या पार्श्वभूमीवर देवरीत मोफत गरबा प्रशिक्षणाचे आयोजन 29 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशन च्या देवरी शाखेकडून करण्यात आले असून यावेळी जिप सदस्य सविता पुराम, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या रझिया बेग , नगरसेविका नूतन कोवे सयाम, गरबा प्रशिक्षक निलेश सोनुले , शिल्पा बांते , कुलदीप लांजेवार , धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट चे सर्व ट्रस्टी सदस्य आदी उपस्थित होते.

सदर गरबा उत्सवामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या उत्साही महिलांनी हजेरी लावली असून अंदाजे 150 महिलांनी यात सहभाग नोंदविला होता. यामध्ये विजयी झालेल्या समूहांना पारितोषिक देण्यात आले असून यावेळी धुकेश्वरी मंदिर परिसर गजबजलेले होते.

Print Friendly, PDF & Email
Share