श्रीराम नवमीला देवरी नगरात भव्य मोटारसायकल रॅली
प्रहार टाईम्स @डॉ.सुजित टेटे
देवरी 08: कोरोना काळात निर्बंधामुळे गर्दीचे सण उत्सव साजरे करण्यावर बंदी होती. राज्यशासनाने नुकतेच सर्व निर्बंध मागे घेतल्यामुळे गुडी पाडव्यापासून सण उत्सव थाटात साजरे करण्यास सुरुवात झाली.
याच पार्शवभूमीवर देवरी मोटार सायकल भव्यरॅलीचे आयोजन १० एप्रिल २०२२ रविवारला सकाळी ०९ : ०० वाजता धुकेश्वरी श्रीराम उत्सव समिती देवरी तर्फे श्रीराम नवमी निमीत्त आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम भक्त बंधू – भगिनींनी आपापल्या मोटारसायकल तथा स्कुटी घेऊन १० एप्रिल रविवारला सकाळी ०८ : ०० वाजता भगवे फेटे आणि भगवे ध्वज बांधण्यासाठी सर्वांनी धुकेश्वरी मंदिरात एकत्र येऊन सहकार्य करावे असे ट्रस्ट च्या वतीने कळविण्यात आले आहे.
सदर भव्य रॅलीचे मार्ग –
मॅा धुकेश्वरी मंदिर, राष्ट्रीय महामार्ग, अग्रसेन चौक, बाजार लाईन, दुर्गा चौक, कारगील चौक, साई मंदिर, गणेश चौक, पंचशील चौक, मस्कऱ्या चौक, बौद्ध विहार, प्रभू श्रीराम मंदिर, चिचगड रोड, राणी दुर्गावती चौक, राष्ट्रीय महामार्ग, मॅा धुकेश्वरी मंदिर, रॅली समाप्ती.
विशेष माहिती –
सदर मोटारसायकल रॅलीत सहभागी होणारे सर्व बंधू आणि भगिनींना भगवे फेटे समिती कडून नि: शुल्क बांधण्यात येतील. तसंच धुकेश्वरी मंदिरात मोटारसायकल रॅली आल्यानंतर सर्वांसाठी अल्पोहारची व्यवस्था करण्यात येणार आहे.