काँग्रेस पक्षाच्या विदर्भातील नेत्यांची दिल्ली येथे सोनिया गांधी यांच्याशी भेट

■ आमदार कोरोटे यांच्या नेतृत्वात भेट घेऊन पक्ष संगठन बळकट करण्याविषयी चर्चा

प्रतिनिधी / देवरी, ता.०८: राज्यातील महाविकास आघाडीचे सकारात्मक वाटचाल, काँग्रेस पक्षाचे संगठन बळकट करणे व सध्या सुरू असलेल्या राज्यातील राजकीय घडामोडी या विषयाला धरून विदर्भातील खासदार, आमदार आणि विधानपरिषदेचे सदस्य यांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे मंगळवार( ता.५ मार्च) रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली.
भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे, चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, आमदार विकास ठाकरे, आमदार राजू पार्वे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोंडे, आमदार अमित झनक, आमदार विक्रांत सावर, आमदार बलवंत वानखेडे, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, राजेश राठोड आदींचा समावेश होता.
या भेटी दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीचे सकारत्मक वाटचाल, काँग्रेस पक्षाचे संगठन बळकट करणे व सध्या सुरू असलेल्या राज्यातील राजकीय घडामोडी या बद्दल चर्चा केली.

Share