विधानसभा क्षेत्रातील क्रीडा संकुलनाचा कायापालट होणार !

■ आमदार कोरोटे यांच्या सतत पाठपुरावा व प्रयत्नामुळे साडे चार कोटी रुपये निधी मंजूर

देवरी ०५: काही दिवसापूर्वी शासनाने जी.आर. काढला आहे. त्याप्रमाणे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यातील क्रीडा संकुलनाच्या विकासा करिता प्रत्येकी पाच कोटी असे एकूण पंधरा कोटी रुपये मिळणार आहे. या करिता आमदार सहषराम कोरोटे यांनी संबंधित विभागाशी पाठपुरावा व प्रयत्न केला तसेच विधानसभेत हा प्रश्न मांडल्याने यावर्षीच्या वित्तीय अधिवेशनात विधानसभाच्या तिन्ही तालुक्यातील क्रीडा संकुलनाच्या विविध प्रकारच्या विकासाकरीता साडे चार कोटी रूपये निधी मंजूर केले आहे. त्यामुळे आता आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यातील क्रीडा संकुलनाचा कायापालट होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार सहषराम कोरोटे यांनी सोमवारी(ता. ४ मार्च) रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे आता काही दिवसापूर्वी शासनाने एक जी.आर. काढला या जी.आर. प्रमाणे प्रत्येक तालुक्यातील क्रीडा संकुलनाच्या विकासाकरिता प्रत्येकी पाच कोटी रु. निधी मिळणार आहे. याप्रमाणे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यातील क्रीडा संकुलनाच्या विकासाकरिता प्रत्येकी ५ कोटी प्रमाणे एकूण पंधरा कोटी रुपये मिळणार आहे. या निधीतून तिन्ही तालुक्यातील क्रीडा संकुलनाच्या सोइ सुविधा यात स्विमिंग ंपूल, स्टेडियम, सर्व खेळाच्या साहित्य खरेदी करीता खर्च करण्यात येणार आहे. या मागणीला धरून आमदार सहषराम कोरोटे यांनी संबंधित विभागाशी सतत पाठपुरावा व प्रयत्न केले आणि विधानसभेत हा प्रश्न मांडला. अखेर या मागणीला वरून या वर्षीच्या वित्तीय अधिवेशनात सदर तिन्ही तालुक्यातील क्रीडा संकुलनाच्या विविध प्रकारच्या विकासाकरिता साडे चार कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आले.त्यामुळे आता आमगावं-देवरी विधानसभेतील देवरी,आमगावं व सालेकसा तालुक्यातील क्रिडा संकुलनाचा कायापालट होणार असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
अशा प्रकारे आमदार सहषराम कोरोटे यांच्या सतत केलेला पाठपुरावा व प्रयत्नाला यश मिळाले आहे. त्यामुळे तिन्ही तालुक्यातील क्रीडा प्रेमींनी आमदार कोरोटे यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share