तीन दिवसीय गोंड महासभा संमेलन उत्साहातविविध कार्यक्रमाचे आयोजन

Deori: गोंड समाजाचे तीन दिवसीय गोंड महासभा संमेलनाचे आयोजन तीन राज्यातील सिमेला लागून असलेल्या देवरी तालुक्यातील अतिसंवेदनशील गोटानपार/ककोडी येथे 3 एप्रिल रोजी उत्साहात पार पडले.संमेलनाच्या पहिल्या दिवशी 1 एप्रिल रोजी बस्तर येथील अंगददेव पेन गायता आणि देव संस्कृती सेवा व गोंड समाजाच्या राजमाता फुलवा देवी यांनी मार्गदर्शन केले. दुसर्‍या दिवशी गोंड आदिवासी संस्कृतीत सुधारणा आणि नियमांचे पालन या विषयावर विविध राज्यातील प्रमुखांनी मार्गदर्शन केले. तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील गोंड समाज बांधवांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संमेलनाचा समारोपीय कार्यक्रमाला आमदार सहसराम कोरोटे, माजी आमदार संजय पुराम, नामदेव किरसन, सावंत राऊत, हसन गिलानी, वसंत पुराम, नरेंद्र नेताम, बाबुराव हेडा, धनसिंग मडावी, तुलसीराम मरकाम, सुरेश दुर्गा, पुर्णानंद नेताम, कुमार कोरोटे, अंगद सलामी, सुजित कावरे, दिनेश कुमीन आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी, समाजाच्या विकासासाठी शिक्षणाचे महत्व अधोरेखीत केले. आयोजनासाठी मोहन हिडको, संजीव ठाकूर, उदयसिंह गोटा, रमेश कोराम, अमृत उसेंडी, संतोष नेताम, फगुनो कल्लू, अनिक दुर्गा, अंगद सलामी, गोविंद ठेका आदींनी परिश्रम घेतले. संमेलनाला विविध राज्यातील हजारो गोंड समाजबांधव उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share