RTE प्रवेशाची लॉटरी लागली, उदयाला मिळेल पालकांना संदेश
डॉ. सुजित टेटे @प्रहार टाईम्स
देवरी 03: शैक्षणिक सत्र 2022-2023 करीत शिक्षणाचा कायदा 2009 नुसार जिल्हात 813 विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळणार आहे. सदर प्रक्रिया 30-31 मार्च ला पूर्ण झाली असून उदयाला (4एप्रिल ) निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश मिळणार आहे.
शैक्षणिक सत्र 2022-2023 करीता 813 विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आहे यामध्ये जिल्हातील 142 नामांकित शाळांनी 25% जागा राखीव ठेवल्या आहेत. 813 जागांसाठी 2 हजार 800 च्या वर विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केलेला आहे. त्यापैकी फक्त 813 विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्याची समूह साधन केंद्रात कागद पत्राची तपासणी करून प्रवेश देण्यात येणार आहे.