नाव उलटल्याने दोन महिला मजुरांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू

देवरी : चिचगड येथून 12 किलोमीटर अंतर असलेल्या घोनाडी या गावात नाव उलटून अपघात झाला , या अपघातात दोन महिला मरण पावल्या, यात रेखा विजय वाढई राहणार घोनाडी (वय ३० वर्षे) तिला पाच वर्षाचा एक मुलगा आहे, आणि दुसरी मनीषा दिनेश गुरनुले राहणार घोणाडी ही पण मरण पावली आहे, हिला दहा वर्षाचा एक मुलगा आहे.

सदर घटना काल दिनांक 28 तारखेची आहे. गावाला लागुन गाढवी नदी आहे. तिला लागूनच गोठणगाव डैम आहे , डैमला बंधारा बांधल्यामुळे नदीला थोप आहे. त्यामुळे नदीत भरपूर पाणी आहे. त्यामुळे नदी पलीकडे असलेल्या शेतामध्ये भाजीपाला लावण्याकरिता सकाळी नावनी पलीकडे गेले होते. वापसी मध्ये नाव उलटल्याने दोन महिल्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला यात बाकी असलेले पाच , सात, लोक पोहून नदीपलीकडे निघाले व आपला जीव वाचवला, प्रकरणाची नोंद पोलीस स्टेशन चीचगड येथे करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार होरे करीत आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें