विदर्भ राज्य आंदोलन समिति तर्फे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर

निवेदनातून विज बिल संपवा, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार नुकसान भरपाई व स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिति करण्याची मागणी

प्रहार टाईम्स

देवरी, ता.१२; देवरी तालुका विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे कोरोना काळातील अवाजवी विज बिल माफ करावे, विदर्भातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी २५ हजार रुपये आतिव्रुष्ठी ची नुकसान भरपाई देण्याची आणि स्वतंत्र विदर्भ राज्य वेगळा करुण देण्याच्या मागणीला धरून शासनाचे प्रतिनिधि नायब तहसीलदार बी.टी.यावलकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सोमवारी रोजी निवेदन सादर केले.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे देवरी तालुका अध्यक्ष अँड. पुष्पकुमार गंगबोईर, अँड. महेश पोगले, योगेश राऊत, संतोष जगने, महमूद शेख, अश्विनी कोरेटी, मयूरी गावड़, देवकी ताराम, आर. एस. मडावी, किरण पदाम, संजय टेंभुर्ने, श्रीराम कोचे, प्रमोद शहारे, प्रीति सोनवाने, व सुनील वानखेड़े आदिंचा समावेश होता.
यावेळी देवरी तालुका अध्यक्ष अँड. पुष्पकुमार गंगबोईर यांनी तालुक्यातील सर्व विदर्भ प्रेमी जनतेला आवाहन केले की, तालुका स्तरावर समितिची सदस्य नोंदणी अभियान येत्या १५ डिसेम्बर २०२० पासून १५ जानेवारी २०२१ पर्यन्त सुरु आहे. तरी जास्तीत जास्त संख्येत या सदस्य नोंदणी अभियानात सहभाग घेण्याकरीता अँड. पी.बी. गंगबोईर मो क्र.९७६५०३३७८८ व कु. अश्विनी कोरेटी मो क्र. ९९२३६२९७९९ यांच्याशी संपर्क करुण आपल्या नावाची नोंदणी करावे असे कळविण्यात आले आहे.

Share