14 हजारांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदार ACB च्या जाळ्यात
सालेकसा 23: गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील सालेकसा पोलिस स्टेशन येथील एका हवालदाराला 14 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना आज झालेली आहे.तक्रारदार हे शेतकरी असुन नालीच्या पाण्यावरून शेजारी सोबत भांडण झाले होते.याविषयी 18 मार्च ला सालेकसा पोलिस स्टेशन भादवी कलम 324 नुसार नोंद करण्यात आली होती. सालेकसा पोलिस हवालदार विजय हुमने यांनी तक्रारदाराला पोलिस स्टेशनला बोलावून सहकार्य करण्याबाबत 15 हजारांची मागणी केली. तडजोड करित 14हजार रुपये देणे होते.परंतु तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठत तक्रार दाखल केली .आज 23 मार्च ला सालेकसा येथील बाजार चौकातील चाय टपरीवर सापळा रचत 14 हजारांची लाच स्वीकारताना पंचासमक्ष विजय हुमने बक्कल नंबर 638 सालेकसा पोलिस हवालदारला रंगेहाथ पकडले . सदर घटनेची भष्टाचार कलम 7 प्रतिबंधक1888 अन्वये नुसार सालेकसा पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुरूषोत्तम अहीरकर व त्यांच्या चमूने केली आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सफी विजय खोब्रागडे, पोहवा राजेश शेंदरे, मंगेश काहाळकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, चालक दिपक बतपर्व सर्व ला. प्र. वि. गोंदिया यांनी केली.