देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बनले शिक्षक, ‘युक्ति आणि कृतीचे’ गिरविले धडे

प्रा.डॉ. सुजीत टेटे

गोंदिया / देवरी 22- गुरुविण जगी थोर काय ? या उक्तीला शोभेल असे कार्य देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर करीत आहेत. गोंदिया जिल्हातील अतीदुर्गम , आदिवासी , नक्षल भागातील विद्यार्थ्यांना सोयी सुविधेच्या अभावी स्पर्धा परीक्षेचे पुरेसे ज्ञान आणि मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे त्यांची पोलिस बनण्याची स्वप्न अधुरी राहतात. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संकेत देवळेकर यांनी स्वतः शिक्षक बनून ‘युक्ति आणि कृतीचे’ धडे गिरविले. समाजात शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. जेव्हा अधिकारी समाजातील विद्यार्थ्यांना ‘डाउन टु अर्थ’ मार्गदर्शन करतात तेव्हा निश्चितच प्रेरणा घेऊन विद्यार्थी उंच भरारी घेऊ शकतो. एकंदरीत गोंदिया सारख्या मागासलेल्या जिल्हाला असे अधिकारी लाभणे म्हणजे शौभाग्यच.

सदर कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या प्रसंगी पोलिस स्टेशन सालेकसा अंतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र बीजेपार येथे राबविण्यात आला होता. यावेळी संकेत देवळेकर यांनी आपल्या अनुभावाबद्दल माहिती दिली. वारंवार येणार्‍या अपयशाला खचून न जाता अत्यंत असोशीने अभ्यास करून यशाला गवशनी घालण्याचे अनुभव यावेळी संगितले. नियोजन , वेळापत्रक , अभ्यास , उजळणी , योग्य पुस्तके यातून होणारा फायदा याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर लक्षात ठेवण्याच्या युक्त्या , संघटना , वस्तु , पदार्थ , संख्या प्रयोगातून पटवून दिल्या . स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना ‘ युक्ति व कृती ‘ यातून अभ्यास कसं करायचा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात 80-90 विद्यार्थी सहभागी झाले असून गरजूंना पुस्तकांचे वाटप करण्यात आले

या कार्यक्रमात पोलिस अधीक्षक विश्व पानसरे , अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर , यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून पोलिस कॅम्प बीजेपर येथील प्रभारी अधिकारी पांडुरंग मुंडे , राजीव केंद्रे सर्व अमलदार यांचे सहकार्य लाभले .

Print Friendly, PDF & Email
Share