“वनवामुक्त जंगल” जनजागृतीसाठी आदिवासी गावाचा पुढाकार
◾️जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या आदिवासी बहुल मिसपीर्री ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
देवरी 20: गोंदिया जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या आदिवासी बहुल ग्रामपंचायत मिसपीर्री ही (१)मिसपीर्री (२) धमदीटोला (३)ऐळमागोंदी असे तीन महसूल गाव व(१)मांगाटोला (२)गुजुरबडगा(३)लक्षात(४)शंभुटोलाअसे सात टोले मिळुन गट ग्रामपंचायत अस्तित्वात आहे, विविध वनसंपदेने नटलेल्या ही भुभाग आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली आहे, उन्हाळ्याचे दिवसात जंगलात वनवा लागन्याचे प्रमाण वाढते व वनवामुळे पावसाळ्यातील उगवलेले नवीन रोपटे जळले जातात व जंगलाच्या ऱ्हास होतो तसेच जंगलातील अनेक जीवजंतू वन्यप्राण्यांना त्रास सहन करावा लागतो.
म्हणून या “वनवा मुक्त जंगल “या संकल्पनेतून उपसरपंच जीवन सलामे यांच्या पुढाकाराने गट ग्रामपंचायत मिसपीर्री च्या सर्व पदाधिकारींचा संयुक्त प्रयत्नाने वनवा लागु नये म्हणून जनजागृती करण्यात आली. या करीता प्रत्येक गावातील १५,१५ युवकांची समीती गठीत करण्यात आली व या समिती मार्फत गावातील प्रत्येक नागरीकांना जागृत करण्यात आले.
“वनवा मुक्त जंगल”या संकल्पनेला प्रतीसाद देत सर्व नागरिकांनी वनवा लागु नये म्हणून प्रयत्न करण्याची हमी दिली जर चुकीने वनवा लागलीच तर ज्यांच्या नजरेस पडली तर वनवा नियंत्रण आनन्यास प्रयत्न करण्याची ग्वाही दिले. या कार्यक्रमानिमीत्त जीवन सलामे उपसरपंच ,दुरगेश कुंभरे माजी सरपंच,तुलाराम उईके यांनी मार्गदर्शन केले.