जागतिक वन दिवस साजरा

◾️सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथे वृक्षारोपण

देवरी 21- तालुक्यातील सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष गावाचे सरपंच पन्नालाल चौधरी तर प्रमुख अतिथि सुभाष दुबे मुख्याध्यापक, नवल पवार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिति , के के सोनकुसरे वनपाल देवरी , पवनकुमार परिहार पो पाटिल , ठांनसिंग बघेल , संतोषवर , डी पी धारगावे ,बी टी पवार , डी एस सोनाग्रे , नंदलाल नाईक , अल्का दुबे आणि शहनाज मिर्झा उपस्थित होते.

वृक्ष लागवत करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन राखावे असे मत मुख्याध्यापक सुभाष दुबे यांनी मांडले. प्रमुख अतिथि यांनी आपले मत विध्यर्थ्यासमोर मांडले. यावेळी विध्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गुंजन राऊत , नेहा परिहार , निहारिका मारबते , यांनी वनाचे महत्व यावर मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एस सोनाग्रे यांनी केले असून आभारप्रदर्शन अल्का दुबे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share