अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा ; एससटी महामंडळाला १ हजार नवीन बसेस देणार

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारकडून शुक्रवारी विधिमंडळात २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प विधानसभेच्या पटलावर ठेवला. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीच्या आधारे हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर येथील स्मारकासाठी राज्य सरकारकडून २५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.

अर्थमंत्री अजित पवार २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडत आहेत. यापूर्वी काल(गुरूवारी) राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. तर निर्बंध हटल्यानंतर परत भरारी घेत उद्योग व सेवा क्षेत्राने राज्याच्या प्रगतीला बळ दिल्याचे चित्र २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. त्याच बरोबर आज काही घोषणा केल्या. त्या पुढील प्रमाणे

इतर घोषणा
– राजगड, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांच्या संवर्धनासाठी १४ कोटींची तरतूद
– शिर्डी विमानतळासाठी १५०० कोटी
– मुंबई, पुणे, नागपूर येथे हेरिटेज वॉक सुरू होणार
– परिवहन विभागाला ३ हजार ३ कोटी रुपये
– समृद्धी महामार्ग भंडारा गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत विस्तार
– मॅगनेटिक महाराष्ट्रः भविष्यात ३ लाख ३० हजार नोकऱ्या देणार
– एसटी महामंडळाला १ हजार नवीन बसेस देणार; अजित पवारांची मोठी घोषणा
– शिवडी न्हावा- शेवा सागरीसेतू २०२३ पर्यंत पूर्ण होणार
– भाऊचा धक्का ते बेलापूर वॉटर टॅक्सीचे दर कमी करणार

Share