मुलींनो लेखणी हाती धरा- सौ.अंजनाबाई खुणे

◾️जागतिक महिला दिवस निमित्य आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ.अंजनाबाई खुणे यांनी दिला संदेश

गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय देवरी येथे जागतिक महिला दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी पदावरून झाडीपट्टी च्या बहिणाबाई उपाधी लाभलेल्या जेष्ठ साहित्यिका ,सौ. अंजनाबाई खुणे यांनी विद्यार्थी- विद्यार्थिनींना हातात लेखणी घेण्याचा मोलाचा संदेश दिला.
महाविद्यालयातील संस्कृतीक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच लीनेस क्लब देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्त्रीसुरक्षा हा संवादाचा मुख्य मुद्दा होता. अनेक विद्यार्थिनींनी याप्रसंगी आपली मते व्यक्त केली.ममता बारेवार ,महिला संरक्षण अधिकारी, महिला- बाल विकास विभाग गोंदिया या प्रमुख वक्ता पदावरून बोलतांना विविध मुद्द्यांना हात घालीत भाष्य करून गेल्या. प्रा.उर्मिला परिहार यांनी महिला दिनाचा आढावा घेतला.
याप्रसंगी डॉ.वर्षा गंगणे यांच्या चटका या कथासंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले.
प्राचार्य डॉ.अरुण झिंगरे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थशास्त्र विभाग प्रमुख,डॉ .वर्षा गंगणे ,राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.सुनीता रंगारी तसेच लीनेस क्लब अध्यक्ष सौ.गौरी देशमुख यांनी कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले.
महिला दिनाचा जागर करण्यासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी,लीनेस क्लब देवरी चे पदाधिकारी, तसेच विद्यार्थी -विद्यार्थीनी उपस्थित होते. अंजनाबाई खुणे यांनी आपल्या कवितांनी सर्वांची मनं जिंकून घेतली. डॉ.शुभांगी मूनघाटे यांचा शॉ ल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच वसुंधरा पोर्टल चे भुपेंद्र मस्के आणि महासगरचे वार्ताहर हिमांशू शर्मा यांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्राचार्या च्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संपूर्ण संचालन कु.आसावरी राऊत,बी ए तृतीय ने केले.प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.वर्षा गंगणे यांनी करून दिला.तर आभारप्रदर्शन कु.वीणा चाचेरे, बी ए द्वितीय ने केले. स्वागतगीत, प्रार्थना आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रम प्रभावी ठरला.कार्यक्रमात दत्तू कागदे, गीता उके,वंदना लाखडे, पूर्वेश उईके ,कमल, रेणू,गायत्री, नाजमीन विणा यांनी अथक परिश्रम घेतले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.वर्षा गंगणे यांच्यातर्फे सर्व उपस्थितांसाठी,विद्यार्थ्यासाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली.

Print Friendly, PDF & Email
Share