बोदलकसा पक्षी महोत्सव-2022 चे 12-13मार्च ला आयोजन

गोंदिया,दि.10 : पर्यटन संचालनालय-नागपूर व जिल्हा प्रशासन-गोंदिया यांच्या सहकार्याने 12 मार्च 2022 आणि 13 मार्च 2022 रोजी बोदलकसा पक्षी महोत्सव-2022 आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे राज्यातील पर्यटन स्थळांची प्रसिध्दी करण्याकरिता संपूर्ण राज्यभर 20 पर्यटन स्थळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भामध्ये रामटेक- जिल्हा नागपूर, बोर- जिल्हा वर्धा व बोदलकसा- जिल्हा गोंदिया या स्थळांची प्रसिध्दी करण्याच्या हेतूने या महोत्सवाचे आयोजन पर्यटन संचालनालय- नागपूर कार्यालयामार्फत आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या काळात आपल्या सर्वांना दैनंदिन जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींवर मुरड घालायला लागली. तब्बल दोन वर्ष आपण घरी राहून, लॉकडाउन, कडक निर्बंधात घालवली. शाळा, महाविद्यालय, बरेचशे प्राइवेट ऑफिसेस वर्क फ्रॉम होम मुळे घरीच होते. आता कुठे हे सर्व निर्बंध शिथिल व्हायला लागले आहेत.
बोदलकसा हे निसर्ग पर्यटन स्थळ गोंदिया जिल्ह्यात असून अतिशय रमणीय असे पर्यटन स्थळ आहे. संपूर्ण जंगलांनी वेढलेले असून या जंगलात वन्य पशू-पक्षी आहेत. पक्ष्यांचे भरपूर प्रकार बोदलकसा इथे पाहायला मिळतात. त्याचप्रकारे ही निसर्गरम्य जागा निसर्गप्रेमींना तसेच पर्यटकांना माहिती व्हावी या उद्देश्याने या पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात अनेक कार्यक्रम राहणार आहे जसे की पक्षी पर्यटन दिंडी, जंगल सफारी, सारस पक्षी संवर्धन- तलावांची जैवविविधता माहिती कार्यशाळा, छायाचित्र प्रदर्शनी, या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त वन्यजीव चित्रपट निर्माता नल्ला मुत्थू यांची वन्यजीव चित्रपट निर्मिती मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केलेली आहे. महिला सायकल रॅली- गोंदिया ते बोदलकसा राहणार आहे, त्याचप्रमाणे दंडार आदिवासी कला नृत्य सादर करण्यात येणार आहे. असे बरेच कार्यक्रम या दोन दिवसीय महोत्सवात राहणार आहे. निसर्ग प्रेमी आणि पर्यटकांना पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय, नागपूर तसेच जिल्हा प्रशासन कडून ही खास पवर्णीच राहणार आहे.
हा महोत्सव 12 आणि 13 मार्च 2022 रोजी बोदलकसा येथे होत असून सर्व निसर्गप्रेमी तसेच पर्यटकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे व प्रशांत सवाई- उपसंचालक (पर्यटन) प्रादेशिक कार्यालय नागपूर यांनी केले आहे.
दिनांक 12 मार्च रोजी पक्षी पर्यटन निसर्ग सहल बोदलकसा, पक्षी पर्यटन दिंडी मंगेझरी, स्वच्छ भारत अभियान बोदलकसा ग्रामपंचायत. स्वागत -दिंडी, निसर्ग सहल, गावकरी स्वच्छ भारत अभियान. पक्षीचित्र, हस्तकला कार्यशाळा-शालेय विद्यार्थी. उद्घाटन समारंभ. स्वागत प्रमुख पाहुणे व मान्यवर. 1) बचत गट दालन भेट 2) छायाचित्र प्रदर्शनी भेट 3) पक्षीचित्र, हस्तकला कार्यशाळा भेट. वन्यजीव चित्रपट निर्मिती कार्यशाळा- नल्ला मुथ्तू. जंगल सफारी (मंगेझरी). पक्षी पर्यटन निसर्ग सहल बोदलकसा. सारस पक्षी संवर्धन व तलावांची जैवविविधता कार्यशाळा- सावन बाहेकर. फिल्म-शोच्या माध्यमातून वन्यजीव संवर्धन, जनजागृती कार्यक्रम, दंडार आदिवासी कला नृत्य.
दिनांक 13 मार्च रोजी पक्षी पर्यटन निसर्ग सहल बोदलकसा. पक्षी दर्शन सायकल रॅली (जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या हस्ते). स्वच्छ भारत अभियान बोदलकसा ग्रामपंचायत. जंगल सफारी बोदलकसा (मंगेझरी) महिला बचतगट. गोंदिया जिल्हा पर्यटन- माहिती- डॉ.राजेंद्र जैन. सारस पक्षी संवर्धन व उपाय (देवधान लागवड) माहिती- कृषि विभाग गोंदिया. गोंदिया जिल्हा वन पर्यटन (सादरीकरण)- आरती फुले (वनरक्षक गोंदिया). फिल्म -शो 1) पक्षी संवर्धन व सारस 2) वन्यजीव व त्यांचा अधिवास. जंगल सफारी पर्यटन सहल (पर्यटक). पक्षी पर्यटन निसर्ग सहल बोदलकसा. पर्यटन – पोलीस समन्वय – मार्गदर्शन – श्री पाटणे (उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा). प्रमाणपत्र व मानचिन्ह वितरण. दंडार आदिवासी कला नृत्य व समारोप, राष्ट्रगान.

Share