ध्येय गाठण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास करा- प्राचार्य सुभाष दुबे

◾️ सुरतोली माध्यमिक विद्यालयातील निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

देवरी 10: कोरोना काळात शाळा बंद होत्या त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर चांगलाच पडला आहे. त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथे इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष देवरी शिक्षण संस्थचे सचिव डीलनसिंग पवार , शाळेचे प्राचार्य सुभाष दुबे , प्रमुख अतिथी ब्लॉसम स्कुल चे प्राचार्य डॉ सुजित टेटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

शिक्षण म्हणजे जीवनातील सकारात्मक बदल आहे , जीवनात यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रम आणि आत्मविश्वास बाळगा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करा असे मत प्राचार्य डॉ सुजित टेटे यांनी व्यक्त केले. ध्येय गाठण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास करा आणि शाळेचे , समाजाचे नाव रोशन करा असे मत प्रा. सुभाष दुबे यांनी व्यक्त केले. कविता आणि अभंगाच्या माध्यमातून डीलनसिंग पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी आपले भावनिक प्रसंग व्यक्त केले. त्यामुळे काहीवेळ सर्व विद्यार्थी आणि शिक्षक भावनिक झालेले दिसले. यावेळी शिक्षक नाईक , सोनागरे , अल्का दुबे , शहनाझ मिर्झा प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेचे शुभेच्छा देण्यात आल्या आणि अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share