रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्या च्या विरोधात नाभिक समाजाने सलून बंद ठेवून नोंदविला निषेध

सालेकसा/ साकरिटोला – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ०६ मार्चला जालन्यातील चर्चासत्रात राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना तिरुपती बालाजी येथील न्हाव्ह्यांची उपमा देऊन नाभिक समाजाचा अपमान केला. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात नाभिक युवा मंच साकरीटोलाच्या वतीने आज गुरुवार 10 मार्च रोजी स्थानिक सलून व्यवसाय कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला.
दनावेंच्या विरोधात संपूर्ण नाभिक समाजाचा आक्रोश उफाळला असून संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील सर्व सलून व्यवसाय बंद ठेवण्यात आला. दरम्यान समाजाचा अपमान करून भावना दुखावल्या बद्दल रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई करुन नाभिक समाजाला न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन प्रशासन मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले. या वेळी
नाभिक युवा मंच साकरी टोला चे अध्यक्ष मनीष चन्ने, उपाध्यक्ष संतोष लांजेवार, सचिव सुरेश चन्ने, कोषाध्यक्ष सुशील शेंडे, विजय शेंडे, श्रिकमल शेंडे, अजय
चन्ने, राजेंद्र शेंडे, अनिल चन्ने, नरेंद्र चन्ने, ऋतिक चन्ने, देवा चन्ने सहित अन्य नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share