ग्रापं कर्मचार्‍यांचा जिल्हा परिषदेवर धरणे

गोंदिया: मागील दोन वर्षापासून ग्रामपंचायत कर्मचार्‍या मागण्यांसंदर्भात शासनाच्या चालढकल धोरणाविरुद्ध निदर्शने करुन आज, 9 मार्च रोजी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषद Employees on ZP कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत ग्रामविकास मंत्र्यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ मागील दोन वर्षापासून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासंदर्भात पाठपुरावा करीत आहे. मात्र शासन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन चालढकल करीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या धोरणाविरुद्ध व आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज, 9 मार्च रोजी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी निदर्शने करुन जिपसमोर धरणे आंदोलन केले.

ग्रामविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, किमान वेतनाची आर्थिक तरतूद करुन जाहीर तारखेपासून फरकासह वाढीव वेतन द्या, उत्पन्न व वसुलीची अट रद्द करा, लोकसंख्येचा जाचक आकृतीबंधात सुधारणा करा, 100 टक्के राहणीमान भत्ता द्या, ग्रॅच्युईटीची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत द्या, अभय यावलकर समितीच्या शिफारशी मान्य करा, भविष्य निर्वाह निधीचा फरकासह भरणा करुन बँक खाती अद्यावत करा, दीपक म्हेसेकर समितीच्या अहवालानुसार पेंशन योजना लागू करा आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना संघटनेचे मिलिंद गणवीर, चत्रुघन लांजेवार, सुखदेव शहारे, रविंद्र किटे, महेंद्र भोयर, विष्णू हत्तीमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share