वाहनाच्या धडकेत गरोदर काळवीटाचा मृत्यू

गोंदिया: तिरोडा ते तुमसर महामार्गावरील मौजा नवेगाव खुर्द येथे 8 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडकेत गरोदर मादी काळविटाचा मृत्यू झाला. अपघातात गरोदर काळविटाच्या पोटातील पिल्लू बाहेर निघाले. जिल्ह्यात महामार्ग व राज्य मार्गावर भरधाव धावणार्‍या वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असाच प्रकार 8 मार्च रोजी सायंकाळी नवेगाव खुर्द परिसरातून जाणार्‍या महामार्गावर घडला. रस्ता ओलांडणार्‍या एका गदोदर काळवीटाला अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की गरोदर काळवीटचे पिल्लू बाहेर आले व दोघांचाही जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. दरम्यान मृत काळवीट व त्याच्या पिल्लाला तिरोडा येथील पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयात आणण्यात आले. आज, 9 मार्च रोजी शवविच्छेदन नंतर मृतक काळवीट व पिल्लूची विल्हेवाट लावण्यात आली.

Share