धक्कादायक ! कुरिअर बॉयने महिलेवर केला प्राणघातक हल्ला
गोंदिया : शहरातील गणेशनगर येथे एका कुरिअर बॉय म्हणून आलेल्या व्यक्तीने महिलेवर प्राणघातक हल्ला केला. मात्र तिच्या अल्पवयीन मुलीने प्रसंगावधान साधल्याने हल्लेखोराने पळ काढला. ही घटना आज, 9 मार्च रोजी घडली.
शहरातील आशिष वर्मा हे आपल्या मोबाईल दुकानात असताना अज्ञात व्यक्ती कुरियर बॉय म्हणून त्यांच्या घरी आला. त्यांच्या पत्नी सोनल शर्मा यांनी घराचा दरवाजा उघडता तो आत शिरला व धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केला. त्यावेळेस सोनल शर्मा यांचा किंचाळण्याचा आवाज ऐकून घराच्या वरील मजल्यावर असलेली त्यांची मुलगी श्रेयाशीने (वय 11) खाली आली व दृश्य पाहून तिने आरोपीच्या पाठीवरील बॅग शक्तीनिशी खेचली असता आरोपीने पळ काढला. पोलिसांना हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये उपलब्ध झाला असून आरोपीने संपूर्ण चेहरा झाकून व घटनेत वापरलेल्या दुचाकीचा वाहन क्रमांक कापडी पट्टीने बांधलेली असल्याची आढळले. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.