‘परीक्षेला सामोरे जातांना’ या विषयावर कार्यशाळा
लाखनी : समर्थ विद्यालयात परीक्षेला सामोरे जातांना याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यास सवयी ,ताणतणाव व्यवस्थापन या अंतर्गत अभ्यास कसा करावा.
स्वतःची अभ्यास पद्धती निश्चित करणे. अभ्यासात मन कसे लागेल, केलेला अभ्यास स्मरणात कसा राहील,खूप अभ्यास करूनही कमी गुण मिळाले तर. याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
ताण तणाव कसा निर्माण होतो. अवाजवी अपेक्षा. संवादाचा अभाव प्रेरणा व नियोजनाचा अभाव. तसेच इतरांची तुलना करणे.
परीक्षेसंदर्भात भीती निर्माण होणे.अभ्यास पूर्ण झालेला नाही, आता कसं होईल परीक्षा केंद्रावरील वातावरण कसे असेल? सगळीच कृतीपत्रिका/प्रश्नपत्रिका अवघड तर नसेल ना? अशा अनेक प्रश्नामुळे भीती निर्माण होते . याबद्दल समुपदेशन केले.
परीक्षा पूर्वी काही तास योग्य झोप घ्या. परीक्षेच्या दिवशी लवकर उठा. तुम्ही लिहिलेल्या नोट्स आहेत त्यावर नजर फिरवा. परीक्षेला जाण्यापूर्वी पुरेसे जेवण करा. परीक्षेत जास्त वेळ जागरण करू नका. मी यशस्वी होणार असा विचार मनात ठेवा.
परीक्षा हॉलमध्ये आत्मविश्वासाने
प्रवेश करा. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर ती पूर्ण वाचा. त्यामुळे
प्रश्नांच्या उत्तराची पूर्वतयारी मेंदूमध्ये होत असते. पेपर मध्ये स्वच्छ व सुंदर अक्षर काढा. तुमची उत्तर पत्रिका वाचण्यायोग्य आणि प्रभावी असावी. म्हणजे ती परीक्षकाला आवडेल. मार्क्स योग्य पडतील. तुमच्या उत्तराचा शेवट मुद्देसूद लिहा. अपयशाचा विचार करू नका. अशाप्रकारे सौ. भुसारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच समुपदेशन केले. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक मासुरकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक भदाडे, प्रमुख उपस्थिती घनमारे तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.