विदर्भ महाविद्यालय लाखनी येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन

लाखनी : विदर्भ महाविद्यालय लाखनी येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयातील महिला तक्रार – निवारण समितीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नाजूकराम बनकर उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ राखी तुरस्कर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व त्या मागची भूमिका मराठी विभाग प्रमुख डॉ. नीलिमा कापसे यांनी आपल्या प्रस्ताविकामधून मांडली. स्त्री पुरुष समानतेमुळे समाजाची प्रगती होईल त्यामुळे स्त्रीयांना त्याचा विकास करण्याकरीता वाव मिळेले असे विचार प्रमुख वक्ते डॉ राखी तरस्कर यांनी मांडले. स्रीयाच्या विकासाची वाटचाल यातच समाजाची देशाची प्रगती आहे असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नाजूक बनकर यांनी मांडले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. दिक्षा दोनोडे बी.ए ३ च्या विद्यार्थीनींने केले. याप्रसंगी मंजूषा गायधने हिने मुलीच्या जन्माचे स्वागत करणार ‘ गीत सादर केले तर . गायत्री निर्वाण हिने जागतिक महिला दिनाच्या संदर्भात आपले विचार मांडले याप्रसगी कार्यक्रमाला प्रा. संजय गिरीपुंजे डॉ. प्रशांत पगाडे प्रा. हेडाऊ प्रा. रामटेके प्रा . धरमसारे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार कु. गायत्री निर्वाण हिने मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले

Share