सायबर पोलीस स्टेशन चंद्रपुर च्या वतीने जागतीक महिला दिनाच्या निमित्याने सायबर बाबत जनजागृती
Chandrapur 9: इंटरनेटचे तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. त्याचा सामना करण्यासाठी चंद्रपूर पोलीस दल सक्षम आहे. परंतु यासाठी नागरिकांनी जागृत राहणे आवश्यक आहे.
मागील काही दिवसांमध्ये महिला अत्याचारा प्रकरणासारख्या घडलेल्या घटना लक्षात घेता महिला व बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच त्यांच्यावर होणाऱ्या सायबर गुन्हे व अत्याचाराबाबत जागरुक करणे आवश्यक असल्याने चंद्रपूर पोलीस
दलातर्फे आज ०८ मार्च रोजी जागतिक दिवस महिला दिन निमीत्य सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक अरविंद साळवे साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधिक्षक (गृह) श्रीमती राधीका फडके मॅडम यांचे मार्गदर्शनात नियोजन भवन जिल्हाधीकारी कार्यालय चंद्रपुर या ठिकाणी सायबर युगात महिला सुरक्षा या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला
सदर कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोनि संदिप एकाडे पाटील, सायबर तज्ञ गोविंद रे, सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस अमंलदार मुजावर अली तसेच संतोष पानघाटे यांनी सायबर गुन्हाबाबत उपाय योजना विषयी मागदर्शन केले तसेच पोउपनि. अश्विनी वाकडे, भरोसा सेल पथक, चंद्रपुर यांनी महिलांचे हक्क, व महीलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात सौ. अजंली घोटेकर माजी महापौर म. न. पा. चंद्रपुर, सौ. प्रणाली कोल्हेकर प्राचार्य सेंट मायक कॉन्वेट चंद्रपुर स्कुल चंद्रपुर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन महिलांच्या कायद्यांबाबत, सायबर गुन्हयांबाबत आणि स्त्रियांचा आरोग्याविषयी जागरूक केले.
सदर कार्यक्रमाचे संचलन श्रीमती मंगला आसुटकर पोलीस नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन नापोअ संतोष पानघाटे यांनी केले. सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक चंद्रपुर अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सौ. राधीका फडके, पोलीस उपअधीक्षक (गृह), यांचे मार्गदर्शना खाली पोनि. संदिप एकाडे सायबर पोलीस स्टेशन चंद्रपुर यांचे नेतृत्वात उत्कृष्टरित्या पार पाडण्यास पोउपनि. अश्विनी वाकडे, भरोसा सेल पथक, पोहवा मुजावर अली व पोना संतोष पानघाटे, भास्कर चिचवलकर, राहुल पोंदे, छगन जांभुळे, वैभव पत्तीवार, उमेश रोडे, प्रशांत लारोकर, अमोल सावे, रुपाली गोंडसे सायबर पोलीस स्टेशन चंद्रपुर यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठीत समाज सेवी संस्था जेसीआय गरिमा, जेसीआय ईलाईट, जेसीआय चंद्रपूर, रोटरी इनरव्हील क्लब, परि क्रिएटिव्ह गृप, सर्व समान महिला बहुउद्देशीय संस्था, फ्रेन्डस गृप व इतर समाज सेवी संस्थाचे प्रमुख व इतर पदाधिकारी, शाळा/महाविद्यालय शिक्षक वृंद, विद्यार्थी व सर्व सामान्य नागरीकांसह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित