समर्थ महाविद्यालयात महिला दिन साजरा
◾️नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य डॉ मनीषा निंबारते आणि नगर पंचायत लाखनी येथील नगराध्यक्षा सौ त्रिवेणी पोहरकर यांचा सत्कार
लाखनी : राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, प्रमुख वक्ते म्हणून डॉ निलिमा कापसे आणि सत्कारमूर्ती म्हणून नवनिर्वाचित मुरमाडी क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य डॉ मनीषा निंबारते आणि नगर पंचायत लाखनी येथील नगराध्यक्षा सौ त्रिवेणी पोहरकर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होत्या. जिथे महिलांचा सन्मान होतो तिथेच देवाची वास्तव असते. महिलांचा सन्मान हा फक्त आठ मार्च ला करायचे नसून वर्षभर केला पाहिजे असे आपल्या भाषणातून डॉक्टर नीलिमा कापसे यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ निंबरते यांनी आपल्या भाषणातून पूर्वी मुलगी झाली की तीला मारून टाकण्याची चुकीची प्रथा होती आज ही प्रथा हळूहळू बंद होत आहे. हे सर्व शिक्षणाने हळू समाज परिवर्तन होत आहे. त्यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांची स्तुती करून महाविद्यालयातील मुलींसाठी स्वयंरोजगारातून मुलींच्या प्रगतीसाठी उपक्रम सुरू करण्याची देखील यावेळी बोलून दाखवले. लाखणी नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा त्रिवेणी पोहरकर यांनी आपल्या भाषणातून महाविद्यालयात नगर पंचायत प्रशासकीय सेवेची गरज पडल्यास नेहमी तत्पर राहू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कापसे यांनी विविध क्षेत्रामध्ये आज मुलींची महिलांची अस्तित्व मोठ्या झपाट्याने वाढत आहे ही आनंदाची बाब आहे. असे असताना आपल्या मधील कौशल्य नेहमी वाढवत राहण्याची गरज आहे. कार्यक्रमाला मंचावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ अनिता दाणी आणि राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा धनंजय गिरेपुंजे प्रामुख्याने उपस्थित होते. महिला दिनाचे औचित्य साधून श्रेया काडगाये या विद्यार्थिनीने महिला दिन विशेष आधारित रांगोळी काढली तिचे महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संगीत विभागातर्फे राखी बावनकुळे यांनी महिला दिन विशेष गीत गायन करण्यात आले. महिला दिनानिमित्त सर्व महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व महाविद्यालयातील कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनिता दाणी यांनी संचालन भाग्यश्री नंदेश्वर तर आभार प्रा धनंजय गिरेपुंजे यांनी मानले.