सहाय्यक पोलीस निरीक्षकाला 5 हजाराची लाच भोवली

अहेरी : पोलीस स्टेशन अहेरी अंतर्गत येत असलेल्या पोलीस चौकी आलापल्ली, येथे नेमणुकीस असलेले सहा पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सोमजी सिडाम, वय ५५ वर्ष यानी ५ हजार रुपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोलीच्या पथकाने कारवाई केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तकारदार हे मलमपल्ली, ता. अहेरी जि. गडचिरोली येथे राहत असुन शेतीचा व्यवसाय करतात कारदार हे ०७/०२/२०२२ रोजी त्यांचे भावाचे नावाने असलेल्या मोटार सायकलने मधीगुदम रोडनी जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक होवून अपघात झाला होता. त्याबाबत पो.स्टे. अहरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्याबाबत पोलीस चौकी आलापल्लीचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सोमजी सिडाम यांनी तक्रारदार यांना पोलीस चौकीमध्ये बोलावून सदर गुन्हयात तक्रारदार यांना आरोपी न करणे व मोटार सायकल परत देण्याकरीता ३० हजार रूपये द्यावे लागतील. पैसे न दिल्यास गुन्हयात आरोपी करण्यात येईल असे सांगितले तकारदार यांना पोलीस चौकी आलापल्लीचे सहा. पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सिडाम यांनी मागणी केलेली साथ रक्कम ३० हजार रुपये देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाव गडचिरोली येथील कार्यालयात येवून तक्रार नोंदविली. तकारदार यांनी दिलेल्या तकारीप्रमाणे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी गोपनीयरित्या सापव्य कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये आरोपी पोलीस चौकी आलापल्लीचे सहा पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सिडाम यांनी पडताळणी दरम्यान अपघाताच्या गुन्हयात तकारदार यांना आरोपी न करणे व मोटार सायकल परत देण्याकरीता ३० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअती ५ हजार रुपये लाच रक्कम ०८/०३/२०२२ रोजी पोलीस चौकी आलापल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली येथे स्वतः स्विकारल्याने त्यांना प्रतिबंधक विभाग, गडचिरोलीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यावरून त्याचे विरूद्ध पो.स्टे. अहेरी येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
सदर कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रवि. नागपूर, मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात अविनाश भामरे, पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर (अति कार्यभार गडचिरोली), सफी प्रमोद दोर, पोहवा नथ्यु भीटे, पो.ना राजेश पदमगिरवार, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकुर, चापोहया तुळशिराम नवघरे सर्वच प्रतिबंधक विभाग, पो.ना. रोशन चादकर बा.पो. राहुल तुमरेडी, ला.प्र.वि. चंद्रपूर यांनी केली.

Share