लायन्स क्लब देवरी तर्फे महिला दिनी आशा सेविकांच्या सत्कार

देवरी 8: लायंस कल्ब देवरी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त देवरी शहरातील आशा सेविकांच्या सत्कार करण्यात आला. यामध्ये सत्कारमूर्ती ममता गोखले , राविता कोटाँगले , रिना मानकर आणि योगिता चनाप यांचा समावेश होता.

आशा सेविका हे सतत रात्रंदिवस समाजाला सेवा देत असतात त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करत त्यांचा शाल श्रिफल व सम्मानचिन्ह देउन करण्यात आला. यावेळी लायंस क्लब अध्यक्ष पारस कटकवार , सचिव आफ़ताब शेख़, कोषाअध्यक्ष हमीद मेमन , झोनचेयर पर्सन पिंकी कटकवार , पूजा गहाने,पुष्पा नलपते,लक्ष्मी पंचमवार, ज्योति रामटेककर,अनिल मेश्राम, तनूजा भेलावे, दिनेश भेलावे आदि उपशथित होते.

Print Friendly, PDF & Email
Share