ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

देवरी : 08 मार्च
ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील महिला शिक्षिकांना मान देऊन प्रमुख अतिथींचे स्थान देण्यात आले होते. वैशाली मोहुर्ले, सरिता थोटे , कलावती ठाकरे ,हर्षदा चारमोडे , मनीषा काशीवार , संगीता काळे, तनुजा भेलावे, रूपाली येरपुडे, स्वाती पालांदूरकर आणि नलू टेंम्भरे उपस्थित होते. सादर कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी केले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिला शिक्षिकांना प्राचार्यांनी भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या . सर्वानी आपले मनोगत व्यक्त केले . पुरुष प्रधान संस्कृतीतून महिलांचा पुढाकार या विषयावर चर्चा करण्यात आली . सदर कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व पुरुष शिक्षकांनी सहकार्य केला . कार्यक्रमाचे सूत्र संचालन इशिका काळे आणि साक्षी मेश्राम यांनी केला असून आभार प्रदर्शन संचिता शेंद्रे विद्यार्थिनींनी मानला .

Print Friendly, PDF & Email
Share