बचतगटांनी वस्तूंच्या गुणवत्तेसोबतच मार्केटिंगवर भर द्यावा – जिल्हाधिकारी नयना गुंडे

महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू गुणवत्तापुर्ण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोणताही उद्योग व्यवसाय म्हटले की, गुणवत्ता, वेळेत पुरवठा व मार्केटिंग आवश्यक असते. त्यामुळे बचतगटांनी वस्तूंच्या गुणवत्तेसोबतच मार्केटिंगवर भर द्यावा –

जिल्हाधिकारी नयना गुंडे

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व उत्कर्ष फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची राज्यस्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. प्रदर्शनीचे उद्घाटन थाटात संपन्न

प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंचे एकूण 50 स्टॉल्स लावलेले आहेत. ही प्रदर्शनी 8 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे, त्यामुळे सदर प्रदर्शनीला जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन वस्तूंची विक्री करावी आयोजकांचे आवाहन

Share