गोंदियाचे जिल्हाधिकारी नयना गुंडे करणार सायकलिंग

गोंदिया : ८ मार्च महिला दिनानिमित्त सायकलिंग संडे द्वारे एक दिन सायकल के नाम या उपक्रमाद्वारे ६ मार्च रविवारला सायकलिंग संडे ग्रुपद्वारे गोंदिया शहरात सायकलिंग करून स्त्री शक्तीला सन्मान देण्यात येणार आहे. यात गोंदिया जिल्ह्याच्या महिला जिल्हाधिकारी नयना गुंडे सहभागी होणार आहेत.
महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या विशेष उपक्रमात गोंदिया शहरातील महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे सायकलिंग संडे ग्रुपद्वारे गोंदिया शहरातील महिलांनासुद्धा सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. आरोग्य संवर्धनासाठी सायकलिंग या उद्देशाने सायकलिंग संडे ग्रुप प्रत्येक रविवारी सायकल चालवत असते त्याच प्रमाणे, विविध दिन निमित्ताने सायकल चालवा, आरोग्य जपा हा संदेश देत असते. या उद्देशाने ६ मार्च रोजी आयोजित सायकलिंग संडे ग्रुप द्वारे सकाळी ६ वाजे गुरुद्वारा रेलटोली येथे जमा होण्यासाठी आवाहन केले आहे. या उपक्रमात ज्या महिलांना सायकलिंगमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्या महिलांनी आपल्या सायकल सोबत सकाळी ६ वाजता गुरुद्वारा रेलटोली येथे उपस्थित राहावे असे आवाहन सायकलिंग संडे ग्रुपद्वारा करण्यात आले आहे.

Share