ब्लॉसम स्कुलमध्ये नृत्य कलेची कार्यशाळा संपन्न

◾️विद्यार्थ्यांनी शिकले नृत्य कलेची कौशल्

देवरी 05: शैक्षणिक संस्काराबरोबर इतर कौशल्य अवगत असणे काळाची गरज आहे. कोरोना काळात शाळा बंद होत्या त्यामुळे शाळेपासून दूर झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये 2 दिवसीय नृत्य कलाविष्कार कार्यशाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेत अक्रोझ अकादमी चे नृत्य प्रशिक्षक आशिष ठाकरे आणि दिव्या मडावी यांनी विद्यार्थ्यांना नृत्ये कलेचे कौशल्य अवगत करून दिले. विविध नृत्य कलेची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. शाळेतील इयत्ता 1 ली ते 9वी चे विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्साहात या कार्यशाळेत भाग घेतला.
सदर कार्यशाळेच्या यशासाठी वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे , हर्षदा चारमोडे , स्वप्नील पंचभाई , नितेश लाडे यांनी सहकार्य केले .

Share