पं. स. कुरखेडा येथील गटविकास अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा

प्रतिनिधी / गडचिरोली : ए.के.तेलंग गट विकास अधिकारी, पंचायत समिती कुरखेडा यांच्याबाबतीत पंचायत समिती सभेत वारंवार रामगडच्या ग्रामसेविकेच्या कामाची चौकशी करून बदलीबाबत पंचायत समिती स्तरावरील 15 वा वित्त आयोगाच्या अमलबजावणीबाबत महागु मेश्राम, ट्रायसेम कर्मचारी यांचे मानधन काढणे या विषयी वारंवार सभेमध्ये मुद्ये उपस्थित करीत आहेत. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने सभागृहाची दिशाभूल केली जात असल्याची समजूत आहे. त्यामुळे श्रीमती तेलंग, गट विकास अधिकारी यांचेविरूध्द त्यांचा अविश्वास आहे.यावर सभाध्यक्षांनी सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांना आपले मत व्यक्त करण्यास सांगितले असता प्रस्तावाला उपस्थित सर्व सदस्यांनी हात वर करून पाठींबा दर्शविला. यावर श्रीमती तेलंग, गट विकास अधिकारी यांनी आपले मत व्यक्त करण्यास मनाई केली असतांनासुध्दा त्यांनी ठरावामध्ये आपल्या स्वमर्जीने मत नोंदविले. त्यामुळे त्यांनी सभागृहाची दिशाभूल केलेली आहे. यावरून असे सिध्द होते की, श्रीमती तेलंग, गट विकास अधिकारी यांनी सभाध्यक्ष, सर्व सदस्य व सभागृहाचा अवमान केला असून एकप्रकारे लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. त्यामुळे श्रीमती तेलंग, गट विकास अधिकारी यांना निलंबित करून बदली करण्यात यावी आणि ठराव कायम करण्यात यावे. तद्वतच ग्रामसेवकांनासुध्दा त्रास होत असल्यामुळे ग्रामसेवक संघटनांनी गट विकास अधिकारी, विभागीय आयुक्त, नागपुर विभाग नागपुर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना निवेदन दिले की, गट विकास अधिकारी हे ग्रामसेवकांच्या मासिक व पाक्षिक सभेमध्ये अरूण कन्नाके, ग्राम विकास अधिकारी यांना तु बायको सांभाळू शकत नाही तर तु ग्रामपंचायत काय सांभाळशील असे एकेरी शब्दात सर्वासमोर सभागृहात बोलुन कोटूंबित बाबी जाहीर करणे त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. तसेच शुल्लक कारणावरून तुम्ही ग्रामसेवक कुठतरी सापडता, पाहून घेईन, मला यावर्षी 4 लोकांना निलंबित करावयाचे आहे असे सभेमध्ये धमकी देणे, कु. रोजलीन खोब्रागडे, ग्रामसेविका यांना वारंवार त्यांच्या ग्रामपंचायती फेरबदल करून एक वर्षात 3 ग्रामपंचायतीमध्ये वरिष्ठांची परवानगी न घेता स्थलांतरीत केल्याने व अपमानीत केल्याने मानसिक ताण येवून तिला पक्षघाताचा आजार झाला. अशा प्रकारची अनेक बाबी नमुद केलेल्या आहेत. तद्वतच पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभेमध्ये गट विकास अधिकारी यांचे विरोधात घेतलेल्या निर्णयाचे अनुषंगाने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा 18 फेब्रुवारी 2022 रोजीसुध्दा मुद्या उपस्थित करण्यात आला. परंतू अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली दिसत नसल्याने आमचेसुध्दा मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यामुळे आपण 5 दिवसाचे आंत कार्यवाही करावी. अन्यथा सर्व पदाधिकारी सामुहीक राजीनामे देऊन उपोषणाला बसणार असा इशारा निवेदन देतांना देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित प्रल्हाद कुल्हाडे जि. प. सदस्य, बौद्धकुमार लोणारे पं. स. सदस्य, मनोज ठुनेदार, कविता गुरुनुले, वर्षा कोकाडे, माधुरी मडावी, शारदा पोरटी होते.

Print Friendly, PDF & Email
Share