ब्रेकिंग : 65 हजाराची लाच घेतांना देवरीचे बीडीओ चंद्रमणी मोडक एसीबीच्या जाळ्यात
गोंदिया 02: जिल्ह्यातील देवरी पंचायत समिति चे खंड विकास अधिकारी चंद्रमणि मोडक हे आज दुपारी दोनच्या दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले आहेत.
विस्तृत माहिती अशी की बिल पास करून देण्याच्या ऐवजी तक्रारदाराकडून खंड विकास अधिकाऱ्यांनी एक लाख रुपये इतकी लाच मागितली होती त्यातील 30 हजार रुपए पूर्वीच देण्यात आले होते व उरलेले 70 हजार रुपये देने भागपडत नव्हते म्हणून तक्रारदारने लाचलूचपत विभागाकडे धाव घेतली 70 हजार रुपए मधून 5 हजार रुपये सूट स्वरुपात कमी करण्यात आले होते व उरलेली 65000/-रुपये आज बुधवार दि.02/03/2022 रोजी देण्याचे ठरले होते.
जिल्हातील नक्षलग्रस्त भागातील देवरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रमनी मोडक याना 65 हजारांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकळले. प्रकरण असे आहे की तक्रारदार हे एक सहकारी संस्थेचे सदस्य असून या संस्थेमार्फत देवरी तालुक्यात विविध योजना अंतर्गत ग्रामपंचायतिना टेंडर झाल्यानंतर विविध साहित्य पुरविण्याचे काम संस्थेमार्फत केल्या जाते. या आधी तक्रारदारानी ग्रामपंचायत भागी आणि पिंडकेपार या दोन ग्रामपंचायत ना मनरेगा कामासाठी 38,00,000 रुपयाचे साहित्य पुरविले होते. या दोन्ही कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदार नी 30,000 हजार रुपयांची याआधी लाच दिली होती . पुन्हा तक्रारदाराची बिले मंजुरी करीता पाठविण्यासाठी आणि पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर झालेल्या कामाकरिता सही करून इस्टीमेट दिल्याच्या मोबदल्यात पुन्हा 65 हजार रुपये ची मागणी गेल्याने तक्रारदार यांनी 17.02.2022 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकळे तक्रार दाखल केली होती. आज सापळा रचून 65 हजाराची लाच घेतांना देवरी पंचायत समिती कार्यालयात अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक, मधुकर गिते, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, यांचे मार्गदर्शनात पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस उपअधिक्षक, सहा.फौ. खोब्रागडे, पो.हवा. राजेश शेंद्रे, ना.पो.शि. राजेंद्र बिसेन, मंगेश काहालकर, संतोष बोपचे, संतोष शेंन्डे, मनापोशि संगिता पटले चालक ना.पो.शि. दिपक बाटबर्वे सर्व लाप्रवि, गोंदिया यांनी केली.