आदिवासी संस्थेच्या सर्व मागण्या शासनाने त्वरित सोडवावे

■ आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनांग यांची मागणी

■ देवरी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या सभागृहात आदिवासी संस्थेचे अध्यक्ष व सचिवांची आढावा बैठक

देवरी ०१: शासनाच्या आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत आदिवासी संस्थे तर्फे एकूण ४० धान खरेदी केंद्रावर भंडारा प्रादेशिक कार्यालय मार्फत एकूण ८ लाख क्विंटल, गडचिरोली अंतर्गत ९ लाख ४७ हजार क्विंटल, अहेरी अंतर्गत ५ लाख ८६ हजार क्विंटल व चंद्रपूर कार्यालय अंतर्गत १ लाख ३३ हजार २०० क्विंटल असे एकूण २४ लाख ६६ हजार २०० क्विंटल धान खरेदी करण्यात आली. खरेदी केलेले धान वेळेवर उचल न केल्याने आदिवासी संस्थेला मोठ्या प्रमाणावर घटतुटचा भुर्दंड शोषावा लागत आहे. तसेच खरेदी कमिशन वेळेवर न मिळाल्याने आणि शेतकऱ्यांचे बारदाना रक्कम व धान खरेदी करतांनी लागणार खर्च ची रक्कम अघाप न मिळाल्याने आदिवासी संस्थेला आर्थिक टंचाई भाषत आहे. त्यामुळे आदिवासी संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळात शासना विरुद्ध रोष आहे. तरी शासनाने आदिवासी संस्थे करिता पैश्याची व्यवस्था करून आदिवासी संस्थेच्या सर्व मागण्या शासनाने त्वरित सोडवावे अशी मागणी देवरी येथील आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनांग यांनी केली आहे.
श्री. दुधनांग यानी देवरी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या सभागृहात रविवार(ता.२७ फेब्रुवारी) रोजी आयोजित भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी सहकारी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या संयुक्त रित्या आयोजित आढावा बैठकीतून मागणी केली आहे.
ही आढावा बैठक देवरी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनांग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाचे संचालक प्रकाश दडमल, आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापकीय व्यवस्थापक जयराम राठोड, गोंडवानाचे जनरल मॅनेजर श्री. येळमे, भंडारा चे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. राठोड साहेब, देवरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुळेवार, नवेगावचे उपप्रादेशिक व्यवस्थापक श्री.साबळे, आदिवासी संस्थेच्या संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर मडावी, सचिव हरीश कोहळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा संस्थेचे अध्यक्ष रमेश ताराम, डवकी संस्थेचे संचालक भास्करभाऊ धर्मशहारे, माजी सचिव मारोतीराव खंडारे, संचालक प्रेमलाल पिहदे, मानिक आचले यांच्यासह भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी संस्थेचे अध्यक्ष व सचिव बहुसंख्येने उपस्थीत होते. या बैठकीचे प्रास्तावीक सचीव हरीश कोहळे यांनी तर संचालन आशिष मुळेवार यांनी केले आणि उपस्थितांचे आभार संचालक प्रेमलाल पिहदे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share