महागाईचा झटका…एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढ
नवी दिल्ली 01: सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी मार्च महिन्यासाठी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती जारी केल्या आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी विना सब्सिडीवाल्या 14 किलोग्रॅम सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली नाही. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइलने 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 105 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर नवी दिल्लीत 19 किलोग्रॅम गॅस सिलेंडरचा नवा दर 2012 रुपये झाला आहे. नव्या किमती 1 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत. 5 किलो सिलेंडरचा दर 27 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे दिल्लीत 5 किलो सिलेंडरचा दर 569 रुपये झाला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. भारतात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एलपीजी सिलेंडरच्या किमती दर महिन्याला ठरवल्या जातात.
मागील महिन्यात फेब्रुवारी 2022 मध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 91.50 रुपयांची कपात झाली होती. मात्र या महिन्यात तब्बल 105 रुपयांची वाढ झाली. या महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झालेली नाही. मागील महिन्यातही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आले नव्हते. घरगुती गॅस सिलेंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावं लागेल. इथे कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. https://iocl.com/Products/IndaneGas.aspxया लिंकवर तुम्ही शहरातील सिलेंडरचा दर तपासू शकता.