जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला एकच ग्रंथ वाचवू शकतो तो म्हणजे संविधान

■ फिनिक्स अकॅडमी वर्धाचे नितेश कराडे यांचे प्रतिपादन

देवरी : तुमच्या समाजाच्या मुलांमुलींकरिता नागपूर येथे समाज भवन निर्माण होत आहे. ह्या भवन बांधकामासाठी समाजातील प्रत्येक लोकांनी आपल्या शक्तीनुसार मदत निधीच्या रूपात सहकार्य केले. तर निश्चित आपल्या समाजातील मुलाच्या शिक्षणासाठी मदत होईल. उच्चशिक्षण हे नौकरीसाठी नाही. हे गृहीत धरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले नव्हते. त्यांना त्यावेळी इंग्रजांनी मुंबईच्या हायकोर्टात न्यायधीशांची नौकरी द्यायला तैयार होते. या नौकरीला लात मारली जर ते शासकीय नौकरीच्या नादात लागले असतो तर ते फक्त आपल्या कुटुंबासाठी झटलो असतो. डॉ. आंबेडकरांनी शासकीय नौकरीच्या नादात न राहता समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एका माळ्यातच ओढले. सगळ्यांना समान हक्क या संविधातून प्रदान केले. या देशात जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला फक्त एकच ग्रंथ वाचवू शकतो तो म्हणजे संविधान असे प्रतिपादन फॉयनिक्स अकॅडमी वर्धाचे नितेश कराडे सर यांनी केले.
आमदार कोरोटे व नितेश कराडे हे दोन्ही देवरी येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा शक्ती मैदानात रविवार(ता.२७ फेब्रुवारी) रोजी आदिवासी हलबा/हलबी कर्मचारी महासंघ गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आयोजित समाज प्रबोधन मेळाव्यात बोलत होते.
या मेळाव्याचे उदघाटन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि कर्मचारी महासंघाचे राज्यध्यक्ष तथा गडचिरोली जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी महासंघाचे सल्लाहगार बी.के.गावराने, महासंघाचे राज्यसचिव मिलिंद कुरसुंगे, महासंघाचे संगठक माधव गावळ, वासुदेव घरत व प्रमुख मार्गदर्शक च्या रूपात फॉयनिक्स अकॅडमी वर्धाचे नितेश कराडे, हलबा/हलबी समाज १८ गढ महासभाचे साहित्यकार कृष्णापाल राणा, हिरालाल भोई, बळीराम कोटवार, चेतन उईके यांच्या सह समाजातील इतर मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सत्कार मूर्ती पं.स.सदस्य शामकला गावळ चिचेवाडा, सुनीताताई राऊत दऱ्रेकसा, सपनाताई नाईक चिखली, चेतन वडगाये डटवा आणि एम.बी.बी.एस. परीक्षेत उत्तीर्ण झालेले समाजातील विद्यार्थ्यांनमध्ये अनुराग भुरकुडे, कौस्तुभ भोयर, कु. ईशीका भोयर, कु. लीना गावळ, कु.आयुषी फरदे, कु.भारती बढई, कु. आचल दिहारी, कु.शुभांगी कोटवार, कु. प्रांजली दिहारी तसेच नितेश कराडे या सर्वांचे उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
या मेळाव्याचे प्रास्ताविक कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रेमलाल कोरोंडे यांनी तर संचालन, महासंघाचे प्रवक्ता मधू दिहारी यांनी तर प्रवक्ता नरेश प्रधान यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या मेळाव्याच्या आयोजनाकरिता कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रेमलाल कोरोंडे, युवराज कोल्हारे, महेंद्र राऊत, सुभाष घरतकर, उरकुडा फरदे, दामोदर गावळकर यांच्या सह कर्मचारी महासंघाचे सर्व पदाधिकारि व सदस्यांनी सहकार्य केले.

Share