उच्चशिक्षण घेऊन शासकीय नौकरीच्या नादात न राहता लघुउद्योगाकडे वळावे- आमदार सहषराम कोरोटे

■ देवरी येथे आदिवासी हलबा/हलबी समाज प्रबोधन मेळावा

देवरी, ता.०१: ह्या प्रबोधन मेळाव्याच्या माध्यमातून सर्व हलबा/हलबी समाजाला एकत्रित करून त्याचे व त्यांच्या मुला मुलींचे जीवनमान कशाप्रकारे उंचावेल या बाबद मार्गदर्शन करणे हाच एकमेव उद्देश आहे. या समाजाने माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्तावर विश्वास ठेवून मला विधान सभेवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी आमदार म्हणून निवडून दिले. आपल्या या विश्वासाला कोठे ही कमी न पडता आपल्या सर्व अडीअडचणी सोडविण्याचे गंभीर पणे प्रयत्न करणार आहे. मी आपल्या आमदारकीच्या काळात आतापर्यंत १५० कोटी रुपयांच्या जवळपास विकास कामे केली आहेत. जर समाजाच्या वतीने उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलामुलींकरिता वाचनालयाची सोय व्हावी या करिता मागणी केली तर निश्चित मी त्या सर्व गावाच्या ठिकाणी सार्वजनिक वाचनालयाच्या बांधकामासाठी अवश्य निधी देणार असल्याची गवाही आमदार कोरोटे यांनी दिली असून आदिवासी हलबा/हलबी समाजाच्या मुलामुलींनी उच्चशिक्षण घेऊन शासकीय नौकरीच्या नादात न राहता लघुउद्योगाकडे वळावे असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

Share