समर्थ महाविद्यालयात मराठी गौरव दिन साजरा
लाखनी : स्थानिक समर्थ महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ मुक्ता आगाशे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ बंडू चौधरी होते.
डॉ मुक्ताआगाशे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन मराठी साहित्याच्या उद्गमापासून तर आजमिती पर्यंत मराठी भाषेचा विकास कसा होत गेला व आजमितीला मातृभाषा मराठी टिकविने किती गरजेचे आहे यावर मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर मातृभाषेला कोणता फायदा मिळेल यावर मार्गदर्शन केले. तर डाँ बंडु चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी मराठी गौरव दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषेत प्रथम आलेल्या योगिता थोटे, चेतना राऊत, विकास नान्हे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रहास खंदारे यांनी तर आभार प्रा वैशाली लिचडे यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.