विद्यार्थी हेच देशाचे भवितव्याचे खरे शिल्पकार – प्राचार्य महेंद्र मेश्राम

◾️सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालय डवकी येथे 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्

देवरी 27: तालुक्यातील सिदार्थ हायस्कुल व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय डवकी येथे इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम , प्रमुख अतिथी म्हणून संदीप शेंडे सहाय्यक संचालक सांस्कृतिक विभाग मुंबई , प्रमुख मार्गदर्शक अनिरुद्ध वनकर ( कलावंत वडसा ) , चेतन उईके सामाजिक कार्यकर्ता प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. प्रमुख अतिथींचे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य महेंद्र मेश्राम यांनी स्वागत केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जिद्द , चिकाटी , मेहनत या तिन सूत्रांचा उपयोग केला तेव्हाच जीवनात आपण यशस्वी होऊ शकतो असे मत प्राचार्य मेश्राम यांनी व्यक्त केले.
ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्राची निवड करून विद्यार्थ्यांनी स्वतःचे गुण आणि क्षमता ओळखून आपले धैय ठरवावे व धैयवेढे व्हावे. असे मत अनिरुद्ध वनकर यांनी व्यक्त केले. यावेळी चेतन उईके यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शक असलेले संदीप शेंडे यांनी राज्य सेवा आणि स्पर्धा परीक्षेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर निरोप समारंभात तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष रामुजी परसगाये , शिक्षक ठवरे , योगेंद्र बोरकर , सुषमा जवंजाळ , ममता टेम्भूर्णीकर , सरिता मेश्राम , धर्मेद्र भोवते , प्रा. निमजे उपस्थित होते.
कार्यक्रमात विध्यार्थी अनमोल नेवारे , सत्यम यावलकर , गुणरत्न राऊत , दीपाली परसगाये , शीतल धनगाये , यांनी आपले मत व्यक्त केले. सूत्र संचालन हर्षाली कुरसुंगे यांनी केले असून आभार ममता टेम्भूर्णीकर यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी मोलाचे सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share