आमगाव पोलिस ठाण्याचे चार पोलीस कर्मचारी निलंबित

आमगाव: हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेला आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी 4 पोलिस कर्मचार्‍यांना निलंबीत केले.

तालुक्यातील बनगाव येथील युवकाची खंडणीसाठी हत्या केल्याची घटना 23 फेब्रुवारी रोजी घडली. आमगाव पोलिसांनी चोवीस तासात आरोपी दुर्गाप्रसाद हरिणखेडे याला अटक केली. दरम्यान आरोपीने पोलिसांना चकमा देत पळ काढला. आमगाव पोलिस ठाणे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय एकमेकाला लागूनच असताना अशा प्रकार घडलाच कसा नागरिकांनी प्रश्न केला होता. दरम्यान काही तासातच आरोपीला पोलिसांनी अटक केली. मात्र हा प्रकार गंभीर असल्याने प्रकरणात पोलिस अधीक्षकांनी 4 पोलिस कर्मचार्‍यांना निलबिंत केले. पोलिस नायक किरण शहारे, खेमचंद बिसेन, गुलाबचंद हरिणखेडे व पोलिस हवालदार हटवार या कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

Share