देवरी येथे रविवारी आदिवासी हलबा/हलबी समाज प्रबोधन मेळावा
■ येथील बिरसा मुंडा शक्ति मैदानात कार्यक्रमाचे आयोजन.
देवरी : आदिवासी हलबा/हलबी समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय नेतृत्व, पुरोगामी महाराष्ट्रात सिद्ध करण्याच्या हेतुने समस्त युवक, युवती, शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी व राजकिये नेते यांनी एकत्र येवून खऱ्या हलबा हलबी समाजाच्या आवाज बुलंद करण्याच्या उद्देश्याने देवरी येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा शक्ति मैदानात येत्या रविवारी(ता.२७ फेब्रूवारी) रोजी सकाळी १०.३० वाजता आदिवासी हलबा/हलबी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे उदघाटन आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि गडचिरोली जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन वर्धाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक नितेश कराडे, युवा प्रकोष्ठ अखील भारतीय आदिवासी हलबा समाज गड महासभेचे साहित्यकार कृष्णापाल राणा यांच्या सह समाजाचे इतर मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमलाल कोरोंडे, उपाध्यक्ष उरकुडा फरडे, सचिव युवराज कोल्हारे, कोषाध्यक्ष महेंद्र राऊत व कार्याध्यक्ष सुभाष घरतकर यांनी केले आहे.