◾️महावितरण च्या ढिसाळ कामामुळे मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन कार जळाली परिहार कुटुंबीयांचा आरोप
देवरी 25: सद्या महावितरणचे जिकडे तिकडे वाढीव बिल आणि कृषी पंपाचे कनेक्शन कापण्यात जोरदार चर्चा असतांना ढिसाळ आणि जीवघेण्या कामाचे प्रकरण समोर आले आहे. प्राप्त माहिती नुसार देवरी येथील प्रकाश परिहार आणि उर्मिला परिहार यांनी घरगुती मीटर दुरुस्त करण्यासाठी महावितरणला रीतसर तक्रार केली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मीटर दुरुस्त केले परंतु काल मध्यरात्री 12:30 च्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि विद्युत मीटर जळाला आणि घरी उभी असलेली कार Maruti celerio ला आग लागली टायर फुटल्याने शेजारी जागे झाले आणि आरडा ओरड केली. रात्री झोपले असतांना हा अग्नी तांडव झाला असून आगीतून परिहार कुटुंबीय थोडक्यात बचावले. यामध्ये त्यांचे वाहन जळून खाक झाले.

परिहार कुटुंबीयांनी महावितरण विरोधात पोलीस तक्रार केली असल्याची माहिती मिळाली.








